Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते.

यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

*ही खते खरेदी करू नये*
शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

का वापरू नये ही खते
खतांमधील इनग्रेड (Ingred) कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे