ऐन दिवाळीत प्रवास महागला! खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ ‘एसटी’ने सुद्धा केली भाडेवाढ..
▪️ खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ एसटीनेही ऐन दिवाळीत भाढेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंत भाडेवाढ लागू राहील. त्यामुळे दिवाळीत ‘एसटी’चाही प्रवास काहीसा महाग ठरणार आहे.
▪️ दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या चाकरमण्यांना आता साधी, जलद, निमआराम, साधी शयनआसनी, वातानुकूलित शिवाई, वातानुकुलित शिवशाही बसने दिवाळी प्रवास करणाऱ्यांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे.
▪️ मिळालेल्या माहितीनुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही २० ते २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी केली जाणार आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
▪️दरम्यान, नागपूर ते औरंगाबाद शिवशाही बसचे भाडे १,११० रुपये आहे. भाडेवाढीच्या कालावधीत नागपूर जाण्यासाठी १,२०५ रुपये मोजावे लागतील

