Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शिंदे गटातील २२ आमदार जाणार भाजपात ? का होतं आहे चर्चा, जाणून घ्या…

शिंदे गटातील २२ आमदार जाणार भाजपात ? का होतं आहे चर्चा, जाणून घ्या…

मुंबई :- शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या रोखठोक सदरातून  करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. आता नेमकं ते नाराज २२ आमदार कोण? कोण कोण भजपात जाणार या विषयावर चर्चा होतं आहे मात्र शिंदे सरकार मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी असं काहीही नसल्याचे माध्यम प्रतिनिधीना सांगितलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ‘भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीला सुद्धा फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात’, असा टोला सेनेनं लगावला.

मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल…

मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले….
शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, असा दावा शिवसेनेनं केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केल जात असल्याचं म्हणत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावरच निशाणा साधला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे