आस्था गृपचे तिसरे आस्था गृप संमेलन २९ आक्टोंबरला अमरावती येथे पार पडणार.
MB-NEWS (अमरावती):-आस्था गृप, अमरावती प्रबोधन, शिक्षण, संघटन, सहकार या चतुर्सुत्रीवर समाजासाठी कार्य करीत आहे.समाजातील तळागळातल्या एका घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आस्था नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अमरावती स्थापन करून सुक्ष्म कर्ज पुरवठा करणे सुरू केले आहे.सोबतच आस्था एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटीचे निर्माण करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, व्यावसायिक स्तरावरचे मार्गदर्शन करणे हे कार्य आस्था गृप करीत आहे.
आस्था गृपचा उद्देश समाजात पोहचवण्यासाठी तसेच वर नमूद केलेले कार्य पार पाडण्यासाठी, साधनसंपत्तीची निर्मिती करण्यासाठी व हे कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम व्यक्तीमत्व तयार करण्यासाठी आस्था गृप दर दोन वर्षांनी आस्था दिप संमेलन आयोजित करीत असते.
यावेळेस तिसरे आस्था दिप संमेलन प्रभादेवी मंगल कार्यालय बायपास बडनेरा रोड अमरावती येथे दिनांक २९ आक्टोंबर २०२२रोजी होणार आहे.संमेलनाध्यक्ष मा.श्री.दिपकराव माथुरकर (शाखा व्यवस्थापक, कॉसमॉस बॅंक अमरावती) हे असणार आहे.प्रमुख अतिथी श्री.हर्षल नक्षणे( मेकॅनिकल इंजिनिअर,inovater of hydrogen car) हे असेल.याशिवाय या संमेलनामध्ये विशेष पदप्राप्त व्यक्ती गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे.यामध्ये नुकत्याच m.p.s.c. परिक्षेमध्ये क्लास वन अधिकारी झालेल्या कु.डॉ.पुनम नागपुरे व सृष्टी नागपुरे (R.T.O.) यांचा सत्कार केला जाईल.तसेच हनुमंतराव साळुंखे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा संचालक हनुमान प्रसारक मंडळ सातारा मा.श्री.संजीवराव हनुमंतराव साळुंखे यांचा सत्कार केला जाईल.मा.श्री.भारतजी गड्डमवार ( C.E.O., Founder & managing director propcyma career solution Pune) यांचा सुध्दा सत्कार करण्यात येईल.
महात्मा फुले ते ऍड.नानासाहेब अमृतकर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य या विषयावर प्रसिद्ध वक्ते मा.प्रा.प्रेमकुमारजी बोके मार्गदर्शन करणार आहेत.पारंपारिक व्यवसायातील आव्हाने या विषयावर प्रा.डॉ.निवृत्तीजी पिस्तुलकर (प्राचार्य, स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आर्णी) हे मार्गदर्शन करतील.स्पर्धा युगात जगणे व जगविण्याचे शिक्षण देण्यासाठी संस्थेचे महत्त्व या विषयावर प्रा.डॉ.सुर्यकांतजी कान्हेरकर ( प्राचार्य, यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर) हे मार्गदर्शन करणार आहेत.
आस्था नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी नागपूरकर हे पतसंस्थेचा लेखाजोखा मांडतील तर आस्था एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.अभयराव आसलकर कार्यकर्त्यांना आवाहन करतील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.उमेशजी पिंपळकर तर सुत्रसंचलन मा.अंकुशजी मानकर तसेच कु.श्रृतीका माथुरकर करतील.पाहूण्याचे आभार मा.श्री.गजाननजी अंजनकर ( संस्थापक आस्था गृप, अमरावती) हे करतील.कार्यक्रमाचा शेवट संविधानाची प्रस्ताविका वाचुन होणार आहे.
या संमेलनात समाजबांधवांना मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.नरेशजी कावलकर,किरणजी शेलेकर,चेतन कानेकर,तिलकजी खेडकर,प्रा.राहूल उंबरकर यांनी केले आहे.

