Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार मोफत..; शालेय शिक्षणमंत्र्यांची  दिपक केसरकर यांनी दिली माहिती..

विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार मोफत..; शालेय शिक्षणमंत्र्यांची  दिपक केसरकर यांनी दिली माहिती..

MB-NEWS (मुंबई ):-राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अशी माहिती दिली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्याच्या तयारीत आहे.

यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पानं कशी लावता येतील, किंवा नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा कदगत येतील यावर विचार सुरु आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी आणि पालकवर्ग सतत दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून मागणी करत होते. अनेक विद्यार्थ्यांना या ओझ्यामुळे काही त्रासही सहन करावे लागत होते.

मात्र आता शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असं सरकारचं म्हणणं आहे. गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा राज्यातील लहान मोठ्या गावांतील गरीब विद्यार्थ्यांना या मोफत वही आणि पुस्तकांचा फायदा होणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी या पुस्तकांची बरीच मदत होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना मोफत वही आणि पुस्तकं मिळाल्यामुळे त्यांची शिक्षणाची गोडी वाढण्यात मदत होईल.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे