भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसची डोमा नाका येथून भव्य बाईक रॅली संपन्न.
MB-NEWS :-(अक्षय अथोटे मेळघाट,चिखलदरा ता.प्र.)
भारतीय_राष्ट्रीय_काँग्रेसचे नेते खासदार राहुल_गांधी यांच्या ऐतिहासिक देशव्यापी भारत_जोडो_यात्रेच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यासाठी मेळघाट विधानसभा युवक काँग्रेस च्या आज बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ चिखलदरा शहरातील डोमा नाका येथून भव्य बाईक_रॅली चे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा या बाईक रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रैलीची सुरुवात सकाळी ११ वाजता डोमा नाका येथून सुरु होऊन बामादेही, काटकुंभ, कन्हेरी, कोयलारी, पाचडोंगरी, कोरडा, गांगरखेड़ा गावात भ्रमण करुण कोटमी फाटा येथे समारोप करण्यात आला, या जनजागृति रैली मुळे मेळघाट मधील आदिवासी गावात कांग्रेस जनासंह परिसरातील नागरिकात भारत जोड़ो यात्रा ही चर्चेचा विषय बनलेला आहे. बाईक रॅलीचे आयोजन मेलघाट युवक कांग्रेस चे अध्यक्ष पियुष मालवीय यांनी केले होते यात किशोर झाड़खंडे, अमित बेलकर, संदीप कासड़ेकर, अमरलाल अमोडे, राजकुमार बेलकर, योगेश कवडे, अंकुश कवडे, संदीप मुंढे, धनराज अथोले, अमोल कोगे मिलिंद सेमरे, शैलेश कासद्देकर, सुनील झाड़खंडे, नीलेश बडोडकर,दयाराम बेठेकर, शाहरुख पठान, सचिन कास्डेकर, पवन बछले, योगेश अथोले, विनोद सुरजाहे, सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

