Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदूर रेल्वेचे तहसीलदार यांची बदली करा…विदर्भ पटवारी संघ शाखा चांदूर रेल्वेची मागणी… कामाचा पाठपुरावा सुरू असतांना तयार केले जात आहे नकारात्मक वातावरण – तहसिलदार इंगळे

चांदूर रेल्वेचे तहसीलदार यांची बदली करा…विदर्भ पटवारी संघ शाखा चांदूर रेल्वेची मागणी…

कामाचा पाठपुरावा सुरू असतांना तयार केले जात आहे नकारात्मक वातावरण – तहसिलदार इंगळे

MB-NEWS (चांदूर रेल्वे) -:चांदूर रेल्वे येथील तहसीलदार हे तलाठी, मंडळ अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे त्यांची बदली करावी व इतर मागण्यांकरिता विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा, चांदूर रेल्वे तर्फे बुधवारी तहसील कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. तर कामाचा पाठपुरावा सुरू असताना आंदोलनकर्त्यांकडून नकारात्मक वातावरण तयार केले जात असल्याचा खुलासा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केला आहे.

चांदूर रेल्वेचे तहसीलदार हे तलाठी, मंडळ अधिकारी यांना कक्षात बोलावून नेहमीच असंवैधानिक शब्दात बोलतात व अपमानास्पद वागणूक देतात तसेच नेहमी गेट आउट असे बोलतात. त्याचबरोबर जनतेसमोर सुद्धा ते तलाठी व मंडळ अधिकारी यांना नेहमीच अपमानास्पद वागणूक देतात. तसेच महिला तलाठी यांचा सुद्धा अपमान करीत असल्याने ग्रामस्तरावर महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करीत विदर्भ पटवारी संघ नागपूर, उपविभाग शाखा चांदूर रेल्वेतर्फे तहसीलदारांविरोधात आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना देण्यात आले.या आंदोलनात मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषराव लंगडे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास ढोले, सहसचिव चेतन तामगाडगे, उपविभाग अध्यक्ष गोपाल नागरीकर, सचिव प्रफुल्ल गेडाम, कोषाध्यक्ष कमल गाठे, तलाठी जिल्हा संघटना उपाध्यक्ष अमोल श्रीखंडे, तलाठी करूना खाजोने, मेघा वाघेला यांसह अनेक तलाठी सहभागी झाले होते. तर याबाबत खुलासा करतांना तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी म्हटले की, संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी वा कोणत्याही महिला तलाठ्याला मी असभ्य शब्दात बोललो नाही. तसेच गेट आउट सुद्धा म्हटले नसून हा आरोप पुर्णत: चुकीचा आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले तसेच संबंधितांनी मुख्यालय राहावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणार नाही अशा सूचना तलाठ्यांना आपण दिल्याचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले. तसेच कामाचा पाठपुरावा सुरू असतांना नकारात्मक वातावरण आंदोलनकर्त्यांकडून तयार केले जात असल्याचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी खुलासादरम्यान म्हटले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे