Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विदर्भ कृषी महोत्सव २०२२ अमरावती येथे सक्षम बहुउद्देशिय संस्थेचा सन्मान,संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर यांचा केला सत्कार

विदर्भ कृषी महोत्सव २०२२ अमरावती येथे सक्षम बहुउद्देशिय संस्थेचा सन्मान,संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर यांचा केला सत्कार

MB-NEWS(चांदूर रेल्वे) :- अमरावती सायन्सकोर मैदानावर पार पडलेल्या तीन विदर्भ कृषि महोत्सव – २०२२ मध्ये अमरावती जिल्हातुन काही संस्था निवडण्यात आल्या होता. त्यामध्ये चांदूर रेल्वे येथिल

सक्षम बहुउद्देशिय संस्थेच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली असुन संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर यांचा सत्कार करण्यात आला.

सक्षम बहुउद्देशीय संस्थेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, जलसंवर्धन क्षेत्रात योग्य व उत्कृष्ट कामे करण्यात आली. तसेच महिला उद्योग समुह स्थापन करणे, महिला बचत गट, महिलांकरता चेतना शिबिर, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, गाव स्तरावर गावचा सर्वागिक विकास कशा होईल यावर जनजागृती, वेगवेगळ्या विषयावर जनजागृती कार्यक्रम पव थनाट्यद्वारे सादरीकरण, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन, आदिवासी युवक युंवतींनी स्वंयम रोजगाराकरिता प्रशिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींकरीता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन यावर संस्थेने काम केले.
तसेच नगर परिषद, चांदूर रेल्वे येथे स्वच्छता अभियानचे ब्रँड अँबेसिडर म्हणून २०१८ मध्ये या संस्थेची निवड सुध्दा करण्यात आली होती.

या सर्व कार्याची दखल घेऊन सक्षम बहुउद्देशीय संस्थेचा विदर्भ कृषी महोत्सवामध्ये सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व श्री स्वामी समर्थांचा फोटो देऊन संस्थेचे अध्यक्ष राजीव शिवणकर यांना गौरविण्यात आले. यावेळी आयोजक गुरु माऊलीचे सुपुत्र नितिन मोरे व आबासाहेब मोरे तथाश्री. पोपटराव पवार आदर्श सरपंच,हिवरे बाजार पद्मश्री पुरस्कार प्राप्त
जि. अहमदनगर रंगमंचावर माजी कृषीमंत्री व खासदार अनिल बोंडे, माजी गृहमंत्री रणजित पाटील व कृषि क्षेत्रातील वरीष्ठ अधिकारी, काही सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. या सत्काराबद्दल सर्व स्तरावरुन संस्थेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे