Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

इ- पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त

इ- पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त….

MB NEWS:प्रतिनिधी:-पवन ठाकरे(नांदगाव खंडेश्वर) 
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील इ पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे स्वस्त धान्य दुकानात धान्यसाठा उपलब्ध असतानाही लाभार्थ्यांना धान्य वितरित करता येत नसल्याची गंभीर समस्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात निर्माण झाली आहे. कधी नेटवर्क समस्या तर कधी लाभार्थ्याच्या अंगठ्याचे ठसे स्कॅनिंग न होणे अशी समस्या निर्माण झाल्या आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार तसेच लाभार्थी कंटाळले  असून तालुक्यातील परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार रात्री धान्याचे वाटप करीत आहे मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे दुकानात गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने इ – पॉस  मशीन प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करणे स्वस्त धान्य दुकानदारांना बंधनकारक केले आहे आता हीच प्रणाली दुकानदार तसेच लाभार्थ्यांना अडचणीची ठरत असल्याचे चित्र नांदगाव खंडेश्वर  परिसरात दिसून येत आहे या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकाकडून व दुकानदाराकडून होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे