Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

उत्तम ब्राम्हणवाडे,रमेश जाधव यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सत्कार,गोवा येथे आयोजित कार्यक्रमात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती

उत्तम ब्राम्हणवाडे,रमेश जाधव यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सत्कार,गोवा येथे आयोजित कार्यक्रमात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती….

MB-NEWS(पवन ठाकरे तालुका प्रतिनिधी :- नांदगांव खंडेश्वर)

गोवा वासीयांच्यावतीने दिला जाणारा पत्रकारीतेतील सर्वोच्च अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील दोन पत्रकारांची निवड निवड समितीकडून करण्यात आलेली होती. त्यामध्ये मंचर (पुणे ) येथील मुक्त पत्रकार रमेश जाधव तसेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील पुण्यनगरीचे पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांचा समावेश आहे .2022-23 चा सदर पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्यातील महामंडलेश्वर शिवानंद महाराज दत्त महाराज देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला होता . या पुरस्काराचे स्वरूप रोख ५१००० रुपये , सन्मान चिन्ह , शाल श्रीफळ व महावस्त्र असे होते. पुरस्कार वितरण महामंडलेश्वर शिवानंद महाराज, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते तसेच केंद्रीय जलमार्ग व पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रवीन आर्लेकर – पेंडणे गोवा, शेखर मुंदडा उद्योगपती पुणे, अतुल भोसले जिल्हा सरचिटणीस भाजपा, माथाडी युनियन संघ पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ नोव्हेंबरला तोलार्ण पेडणे (गोवा ) येथे प्रदान करण्यात आला आहे .

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असलेले पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे हे गेली २२ वर्षापासुन पुण्यनगरी सह अनेक वृत्तपत्रामध्ये बातमीदार म्हणुन काम करत आहे . विदर्भातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम ब्राम्हणवाडे यांनी आपल्या लेखनीतुन करत आहे . त्यांच्या पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .
दरम्यान अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पत्रकारीता, सामाजिक व राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे