Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, ‘या’ महिन्यात होणार ‘टेट’ परीक्षा..

राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, ‘या’ महिन्यात होणार ‘टेट’ परीक्षा..

जिल्हा परिषद शाळांमध्ये 29,600 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-2023 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी (टेट) होणार असून, निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाईल. मेरिटनुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलद्वारे जूनपूर्वी थेट नियुक्ती दिली जाईल.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लवकरच शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.

फेब्रुवारीत होणार ‘टेट’
पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’, तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होईल. त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शालेय शिक्षण विभाग उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल,परंतु त्यासाठी वित्त व नियोजन विभागाचा ‘हिरवा कंदिल’ मिळणे आवश्यक आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे