Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शिंदे फडवणीस सरकारने स्वीकारावी अपघाताची जबाबदारी माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांची मागणी…

शिंदे फडवणीस सरकारने स्वीकारावी अपघाताची जबाबदारी माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांची मागणी…

नागपूर -औरंगाबाद महामार्गावरील खड्ड्याने घेतले आठवडाभरात तीन बळी..

MB-NEWS (अमरावती):-नागपूर औरंगाबाद महामार्ग अंतर्गत पुलगाव ते मंगरूळ चव्हाळा या लांबी मध्ये महामार्गावरील खड्ड्याने एका आठवड्यात तीन बळी घेतले रस्त्यावरील खड्डे बुजवल्यांचे फोटो प्रकाशित करणाऱ्या लोकप्रतिनिधी व शिंदे -फडणवीस सरकारने या अपघाताची जबाबदारी स्वीकारून तात्काळ मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना दहा लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केली आहे.

नागपूर -औरंगाबाद या महामार्गावरील पुलगाव – मंगरूळ चव्हाळा लांबीचा महामार्ग खड्यामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे मोगरा येथील अजय कांबळे, मंगरूळ चव्हाळा येथील ज्ञानेश्वर झोपाटे तर शनिवारी शेंदुरझना खुर्द येथील भूमिका महादेव समोसे या तिन्ही युवक- युवतीचा बळी रस्त्यावरील खड्ड्याने आठवडाभरात घेतला आहे.
दिवाळीपूर्वी देवगाव -तळेगाव दशासर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असतांनाचे आमदार प्रताप अडसड यांनी फोटो काढून या कामाचे श्रेय मिळविले परंतु दोनच दिवसात काम बंद झाल्यानंतर काम करून घेण्याचे कोणत्याही प्रयत्न केला नाही परिणामी या महामार्गावर तीन युवक युवतीचे बळी गेल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे
या महामार्गावरील अपघातामध्ये बळीची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाचे अधिकारी यांचे तसेच स्थानिक आमदार प्रताप अडसड यांचे दुर्लक्ष होणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांनी म्हटले आहे त्यामुळे त्वरित युद्ध पातळीवर या महामार्गावरील खड्डे योग्यरीत्या बुजवून यानंतर बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी खड्डे न बुजवल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांनी दिली

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे