Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धामणगावचे तहसीलदार प्रदीप शेलार निलंबित

  1. धामणगावचे तहसीलदार प्रदीप शेलार निलंबित

MB-NEWS (प्रदीप भुसारी, धामणगाव रेल्वे)माझ्याशी जुळून न घेतल्यास मी आपले राजकीय वर्चस्व धोक्यात आणू शकतो. माझे मंत्रालयापर्यंत मोठे संबंध आहेत. त्यामुळे गाठ माझ्यासोबत आहे, अशी आ. प्रताप अडसड यांना धमकी व इशारा देणारे धामणगावचे तहसीलदार प्रदीप शेलार यांना शासनाने निलंबित केले आहे.

येथील धामणगांव तहसील कार्यालयात प्रदीप शेलार तहसीलदार असताना त्यांनी शेतकरी हिताची कामे बाजूला सारून नेहमी अवैध
गौणखनीज धारकांची पाठराखण केली.होति दरम्यान वर्धा नदीच्या
रेतीघाटातून दिवसा उत्खनन व गौणखनीजधारकांची पाठराखण करीत होते वाहतुकीला परवाना नसताना रात्रीला बोटींद्वारे रेतीचे उत्खनन सुरूहोते.

आ. प्रताप अडसड व मंगरूळ दस्तगिरचे ठाणेदार सुरज तेलगोटे व त्यांचे सहकारी यांनी रात्रीच्या सुमारास धाड टाकून
चार बोटी तसेच अनेक ट्रक जप्त केले होते. तहसीलदार प्रदीप
शेलार यांनी घटनास्थळी न पोहचता उलट दुसऱ्या दिवशी आ. प्रताप अडसड यांचे राजकीय वर्चस्व संपवून टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या. व त्यानंतर प्रताप अडसड यांनी लेखि तक्रार दिली होती त्या अनुशंगाने त्यांना निलंबित करण्यात आले
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
प्रशासनातील प्रत्येक अधिकारी,कर्मचारी हे जनतेच्या कामासाठी आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाची कामे वेळेवर पूर्णकरावी. कोणतीही नियमबाह्य कामे करू नये, हीच अपेक्षा आहे–: आ. प्रताप अडसड

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे