Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

स्टेट बँक ऑफ तळेगाव ठाकूर तर्फे कर्जमुक्ती लाभार्थ्यांचं सत्कार सोहळा….

स्टेट बँक ऑफ तळेगाव ठाकूर तर्फे कर्जमुक्ती लाभार्थ्यांचं सत्कार सोहळा….

MB-NEWS (सुनील घोडमारे, तिवसा प्रतिनिधी):-समाजात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील कि जिथे कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार होतात, शेतकरी अहोरात्र शेतीमध्ये घाम गाळत असतात शेतीसाठी कष्ट करीत असतात, बहुतांश वेळा येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते तर कधी पिकांना भाव मिळत नाही या सर्व समस्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमधून सोडविण्याचा दृष्टीने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास सुरु केली आहे.

सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कठीण काळातही ज्या शेतकऱ्यांनी आपले कृषी कर्ज बँक आणि शासनाच्या निकषाप्रमाणे नियमित परतफेड केली असे या शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रोत्साहन पर रुपये पन्नास हजार दिले गेले त्याबद्दल तळेगाव ठाकूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे या शाखेचे तीन कर्जदार शेतकरी पहिल्या यादीत पात्र झाले आहेत .या पात्र शेतकऱ्यांमध्ये श्री वासुदेव बाळकृष्ण पाटील, श्रीमती कमलाताई वासुदेवराव पाटील, तसेच सतीश मारोतराव पाटील यांचा समावेश आहे या तिन्ही शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक तळेगाव ठाकूर तर्फे कार्यक्रम घेऊन या शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर राशी मिळाल्याबद्दल आणि घेतलेले कर्ज नियमित कठीण परिस्थितीतही व्यवस्थित भरले त्याबद्दल त्यांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि अभिनंदन करण्यात आले. अतिशय कठीण परिस्थितीत आणि अतिवृष्टी ग्रस्त वातावरण असतानाही हवामान अनुकूल नसूनही त्याही काळात त्यांनी बँकेचे कर्ज परतफेड केली त्याबद्दल याप्रसंगी त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापक, भूषण कैलास पेंढारकर, बँकेचे कॅशियर भूषण मुकुंद पाठक, बँकेचे कंत्राटी कर्मचारी गंगाधर मोतीरामजी मेहरे, अनंत माणिकराव बानोस्कर, आदी उपस्थित होते. सदर लाभार्थ्यांचे कौतुक बँकेचे नियमित कर्जदार आणि परतफेड करणारे कर्जदार म्हणून त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे