Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेतकरी वर्ग यांच्या साठी मोठी बातमी :-राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ…

शेतकरी वर्ग यांच्या साठी मोठी बातमी :-राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ…

▪️ अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

किती मिळणार भरपाई 

▪️जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6800 रुपयांऐवजी, आता 13,600 रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी आता 27  हजार रुपये भरपाई मिळणार आहे – असा निर्णय महसूल व वन विभागाने जाहीर केला आहे…

▪️ तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी 36 हजार रुपये भरपाई मिळणार. याशिवाय, राज्य सरकारने नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे….

▪️राज्य विधी मंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद करण्यात येईल. त्यानुसार हा निधी शासन आदेशाप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत , असेही राज्य सरकारने म्हटले आहे…

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे