Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

घुईखेड येथे नव्या शाखेचे आज लोकार्पण घुईखेड येथे नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या लोकार्पण सोहळ्या करीता मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती..

घुईखेड येथे नव्या शाखेचे आज लोकार्पण
घुईखेड येथे नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या लोकार्पण सोहळ्या करीता मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती..

MB-NEWS (चांदूर रेल्वे) – चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा, घुईखेड येथील वास्तूचा लोकार्पण सोहळा आज रविवारी सायंकाळी ५ वाजता माजी आमदार अरुण अडसड यांच्या अध्यक्षतेत व राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडणार आहे.तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक डी. एम. पालोदकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, घुईखेडच्या सरपंचा वर्षलता जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक दिनेश बोबडे, घुईखेड शाखा व्यवस्थापक आनंद शेंडे यांनी केले आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे