Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

परमहंस श्री संत सुरेश बाबा यांचा 63 वा प्रगटदिन महोत्सवाला सुरवात..परमपूज्य श्रीकृष्णकुमार पान्डेय महाराज ( कशी बनारस वाले) यांच्या सुमधूर वाणीतून श्रीमद्भागवत कथा पर्व..31 डिसेंबरला होणार यात्रा व महाप्रसाद समाप्ती

परमहंस श्री संत सुरेश बाबा यांचा 63 वा प्रगटदिन महोत्सवाला सुरवात..परमपूज्य श्रीकृष्णकुमार पान्डेय महाराज ( कशी बनारस वाले) यांच्या सुमधूर वाणीतून श्रीमद्भागवत कथा पर्व..31 डिसेंबरला होणार यात्रा व महाप्रसाद समाप्ती

पवन ठाकरे प्रतिनिधी (नांदगांव खंडेश्वर):-संतांची भूमि म्हणून ओळख असलेल्या श्री फुबगांव येथे परमहंस श्री संत सुरेश यांच्या 63 व्या प्रगट दिनानिमित्त परमपूज्य श्रीकृष्णकुमार पान्डेय महाराज ( कशी बनारस वाले ) यांच्या सुमधूर वाणीत श्रीमद्भागवत कथा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भागवत सप्ताह 24 डिसेंबर रोजी सुरू झाला असून 31 डिसेंबरला ह. भ. प. श्री देवदत्त आढाऊ महाराज यांच्या सुमधूर वाणीतून महाप्रसाद व यात्रा महोत्सवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
संत सुरेश बाबा यांच्या संपूर्ण आयुषातील त्यांच्या चमत्कारिक अद्भुत लीलांनी अचंबित झालेल्या भक्तांच्या मनात अजूनही सुरेश बाबा यांचे विषयी आजही मोठ्या प्रमाणात श्रद्धा आपल्याला दिसून येत आहे. फुबगांवासी त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदात दरवर्षी साजरा करतात. तसेच त्यांची ख्याती दूरवर असल्यामुळे दूर दुरून भक्तांचा फुबगांवात जनसागर आपल्याला दिसून येते. तसेच प्रसाद स्वरुप पन्नास रुपयाच्या लकी ड्रॉ पावती फाडल्याने नशीबाच्या जोरावर मोठ मोठाले पारितोषिके येथून भक्तांगण येथून घेऊन जातात.
संपूर्ण कार्यक्रम आठ दिवस चालत असल्यामुळे कार्यक्रमात कीर्तन, भारूड, सुरेश बाबा यांचे ग्रंथ वाचन, हरिपाठ यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामूळे गावात लोकांची अफाट गर्दी होत असल्याने जनतेच्या सुरक्षेत पोलीस जवानांना सुद्धा तैनात करून परिस्थिती हाताळावे लागते.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून आलेल्या पायदळी चालत आलेल्या दिंड्यांची मिरवणुक संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालून जन्मोत्सवानिमित्त आनंद घेतात.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे