Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करून केली हत्या…!जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष.

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करून केली हत्या…!जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष.

औरंगाबाद (प्रतिनिधी):- औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.. बापू खिल्लारे (वय 30 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे.

▪️याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे बहिणीच्या पतीची भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ही निर्घृण हत्या केली आहे.

▪️ खून करून आरोपीने केला जल्लोष
संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
काही तासातच आरोपी ‘ प्रिन्स ‘ ला ठोकल्या बेड्या
याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे