न.प सफाई कामगारांच्या साखळी उपोषणाला 3 महिने पूर्ण!गांधी जयंती पासून सुरुवात….आजी -माजी आमदारांनी फिरवली पाठ…..प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर.

न.प सफाई कामगारांच्या साखळी उपोषणाला 3 महिने पूर्ण!गांधी जयंती पासून सुरुवात….आजी -माजी आमदारांनी फिरवली पाठ…..प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर.

MB-NEWS(नांदगाव खंडेश्वर) पवन ठाकरे:-नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर समोर महात्मा गांधी जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2022 पासून सफाई कामगारांनी साखळी उपोषणास सुरुवात केली होती आज सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी या साखळी उपोषणाला 3 महिने पूर्ण झाले आहे. आणि जोपर्यंत कामगारांना नगरपंचायत पूर्ववत सफाई कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नवा वर्षाचा संकल्प सुद्धा कामगारांनी केलेला आहे.
कृष्णाई ट्रेडर्स अँड कंट्रक्शन चे ठेकेदार विशाल तिवारी, सहभागीदार संस्थेचे ठेकेदार श्री गोविंदा सफाई कामगार नागरी सेवा. संस्था यांच्या मजोरीमुळे सर्व उपोषणकर्त्या सफाई कामगारांना नैसर्गिक व हक्काच्या रोजगारापासून वंचित राहावे लागले. नगरपंचायत कडून कामगार आयुक्त कार्यालयात मुख्याधिकारी यांनी कामगारांच्या यादीचा प्रस्ताव सादर करूनही संबंधित ठेकेदार सफाई कामगारांना कामावर घेण्यास चालढकल करीत आहे. संबंधित ठेकेदारावर कुठल्याही प्रकारचा वचक नगरपंचायत मुख्याधिकारी यांचा नाही. ठेका देत असताना सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना बहाल करण्यात आले आहे. तरी मुख्याधिकारी आपल्या अधिकाराचा वापर योग्य रित्या करीत नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलेला आहे.
याच कामगारांच्या मतांनवर आजी-माजी आमदारांनी विधानसभेत प्रवेश मिळवला. जेव्हा त्यांच्या रोजगारासारख्या नैसर्गिक मूलभूत हक्क हिरावला जात असताना मतदार संघाचे कैवारी मनवणारे आजी-माजी आमदारांनी साधी भेट देण्याचे धाडसही दाखवले नाही म्हणजे किती उदासीनता आहे. हे यावरून कळते या सफाई कामगारांचे साखळी उपोषण ऐतिहासिक होत आहे. एवढे प्रदीर्घ काळ चाललेले आंदोलन किंवा पुढे चालू राहील एकमेव आहे असे गावातील व तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.
साखळी उपोषणात दिनेश अंबाडकर, दीपक पिंगळे, जयेंद्र सुने,प्रणाल सोनोने, चेतन उईके, संजय ढोके, प्रल्हाद डकरे,दत्ता शेंडे, पुंडलिक पुंड,नारायण सोनोने,विठ्ठल झिमटे,लक्ष्मण झिमटे, शशिकला घोडाम,अरुणा फुरसंगे, अर्चना उईके, माधुरी वठी, इंदिरा उईके, कविता मसराम, माया टेकाम हे सफाई कामगार उपोषण करीत आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे