Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

एसटी प्रवास आरामदायी होणार, लाल परीमध्ये मिळणार ‘या’ जबरदस्त सुविधा..

एसटी प्रवास आरामदायी होणार, लाल परीमध्ये मिळणार ‘या’ जबरदस्त सुविधा..

▪️ सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाने जून- 2023 पर्यंत 3200 साध्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या बसमध्ये ‘पुशबॅक बकेट’ आसने बसवण्यात येणार आहेत.

▪️ सध्या दोन हजार बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी 700 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकार देणार आहे. या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे.

▪️ गाड्यांचा खडखडाट थांबणार
एसटी प्रवास करताना, काचांच्या तावदानांचा मोठा आवाज येतो. हा आवाज रोखण्यासाठी नव्या गाड्यांमध्ये उच्च प्रतीच्या रबरी मोल्डमध्ये काचा बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे गाड्यांचा खडखडाट थांबणार आहे.

▪️तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाल व पांढऱ्या रंगात गाड्या आल्या होत्या. मात्र, नवीन साध्या गाड्या लाल रंगातच असणार आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे