Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शहजाद खान,जिल्हा उपाध्यक्षपदावर मनिष खुणे यांची वर्णी,तालुका उपाध्यक्षपदी राहूल देशमुख तर सचिवपदी राजीव शिवणकर यांची निवड

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शहजाद खान,जिल्हा उपाध्यक्षपदावर मनिष खुणे यांची वर्णी,तालुका उपाध्यक्षपदी राहूल देशमुख तर सचिवपदी राजीव शिवणकर यांची निवड….

MB-NEWS अमरावती (चांदूर रेल्वे) -:अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ, शाखा चांदूर रेल्वेच्या तालुकाध्यक्षपदी शहजाद खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर तालुका उपाध्यक्षपदी राहूल देशमुख व सचिवपदी राजीव शिवणकर यांची निवड झाली असुन जिल्हा उपाध्यक्षपदावर मनिष खुणे यांची वर्णी लागली आहे.

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाची बैठक नुकतीच चांदूर रेल्वे येथील हॉटेल गोविंद वाडा येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सल्लागार सुरेश ढवळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उत्तमराव गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष जानराव मनोहर, तिवसा तालुकाध्यक्ष भुषण यावले आदींची मंचावर उपस्थिती होती. या बैठकीत मान्यवरांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, चांदूर रेल्वेच्या शाखेची सन २०२३ करिता नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी शहजाद खान यांची सर्वानुमते वर्णी लागली. यानंतर उपाध्यक्षपदी राहुल देशमुख तर सचिवपदी राजीव शिवणकर यांची सुद्धा निवड करण्यात आली. याशिवाय जिल्हा उपाध्यक्षपदी मनीष खुणे यांची निवड करण्यात आली. या सर्वांच्या निवडीबद्दल त्यांचे पत्रकार युसूफ खान, उत्तमराव गावंडे, प्रा. रवींद्र मेंढे, बाळासाहेब सोरगिवकर, अमोल गवळी, राजेश सराफी, इरफान पठाण, मंगेश बोबडे, धिरज नेवारे, विनय गोटफोडे, प्रशांत सिसोदीया यांसह अनेकांनी कौतुक केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे