Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

लोणी( टाकळी) येथे २१००भक्तांनी केले संत गजाननाचे सामूहिक पारायण .आ.प्रताप अडसड यांचीउपस्थित भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन..

लोणी( टाकळी) येथे २१००भक्तांनी केले संत गजाननाचे सामूहिक पारायण .आ.प्रताप अडसड यांचीउपस्थित भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन..

MB-NEWS नांदगाव खंडेश्वर(पवन ठाकरे) प्रतिनिधी:-
नांदगाव खडेश्वर तालुक्यातील लोणी ( टाकळी) येथे प्रथमच श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण सेवा समिती यांनी आयोजीत केलेल्या 2100 भक्ताचे एक दिवसीय श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याने उपस्थित असलेल्या भाविक भक्तांचे डोळ्याचे पारणे फेडले या पारायण सोहळ्यामध्ये अमरावती येथील कु. शुभदा मेटकर या सतरा वर्षीय मुलीने श्री चे पारायण तोंडपाठ म्हटले या पारायणामध्ये कीर्तन , महाआरती आणि भव्य दिव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गावातील तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो नागरीकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता त्यावेळी गावातील व परीसरातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सेवाधारी देऊन हा सोहळा पार पाडला आणि आपली मोलाची कामगीरी पार पाडली, या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड याचेसह खा.रामदास तडस यांचे स्विय्य सहाय्यक राजेद्र हजारे,पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे, निकेत ठाकरे,तुळशीराम धानोरकर, चांदूर रेल्वेचे पत्रकार प्रशांत सिसोदिया तसेच अमरावती येथील गुरुकृपा डेव्हलपरचे संचालक शामसुंदर बाखतार भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक तिखीले यांचा आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विविध सामाजीक,धार्मीक, क्षेत्रातील कार्य करणारे मान्यवर ,व तसेच पत्रकार क्षेत्रातील मंडळीचा यावेळी सत्कार शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्याने लोणी गावामध्ये दिवसभर भक्तीमय वातावरण दिसून येत होते. या कार्यक्रमाला हजारो गजानन भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे