Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

हायवेवर रोही आडवा आला अन कार गेली थेट शेतात. तळेगाव ठाकूर फाट्यावरील घटना.

हायवेवर रोही आडवा आला अन कार गेली थेट शेतात.
तळेगाव ठाकूर फाट्यावरील घटना.

MB-NEWS( गुरुकुंज मोझरी ) आशिष देशमुख – :नागपूर वरून अमरावती कडे जाणाऱ्या कारला हायवेवरील तळेगाव ठाकूर फाट्याजवळ मंगळवारी पहाटे अचानक रोही आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झालेली कार ही थेट बाजूच्या शेतात पलट्या घेत क्षतीग्रस्त झाली.यात मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अंगावर शहारे येणारी ही घटना असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, MH 39,BW 3029 ही कार अमरावतीच्या दिशेने आज पहाटेच्या सुमारास तिवसा मार्गे हायवेने जात होती.अश्यातच या धावत्या कारला अचानक रोही आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाच्या ताब्यातील वाहन हे अनियंत्रित होऊन पलट्या घेत बाजूच्या चण्याच्या शेतात पोहचले असल्याचे उपस्थित काही जणांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.अपघाताची ही घटना अंगावर शहारे आणणारी होती.या अपघातात कारचालकासह एक जण जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.मात्र कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. .शेतात पलट्या घेत क्षतीग्रस्त झालेल्या अपघातग्रस्त कारला पाहण्यासाठी अनेक जणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे