Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

घुईखेड येथे श्री.संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून झाली सुरूवात…

घुईखेड येथे श्री.संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळ्याला  झाली सुरूवात…

MB-NEWS (चांदूर रेल्वे) -:चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्रसिध्द श्री.संत बेंडोजी महाराज यांचे संजिवन समाधी सोहळ्याला रविवार (ता.२२)पासुन सुरूवात झाली असुन ते २९ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आणि विदर्भातील एकमेव संजिवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संजिवन समाधी घेतली होती. इ.स.१३३७ पासुन बेंडोजी महाराजांच्या संजिवन समाधी सोहळा सुरू आहे.या सोहळ्याचे यंदा ६८६ वे वर्ष असुन आता सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
रविवार सकाळी श्री संत बेंडोजी महाराज मंदिरात तिर्थ स्थापना,कलश स्थापना,अभिषेक,लघुरूद्राभिषेक संस्थानचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर दिनकर घुईखेडकर व बाळासाहेब देशमुख सहपत्नी यांच्या हस्ते श्रीरामकथा व कलश स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात सनई वादनाने करण्यात आली.यावेळी प्रविण घुईखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर दररोज संगीतमय रामकथा प्रवक्ता ह.भ.प.सु.श्री.स्नेहगंगाताई आळंदीकर ह्या करणार आहे.दररोज सकाळी ५ ते ६ वाजता सामुदायिक प्रार्थना,काकडा आरती,ग्राम सफाई व गावातून फेरी काढण्यात येणार आहे.रोज सकाळी ८ वाजता आरती,श्री बेंडोजी बाबा महाराज ग्रंथाचे पारायण वाचन ह.भ.प.निवृत्तीनाथ गोळे (बग्गी) हे करणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व त्यानंतर सामुदायिक प्रार्थना होणार आहे. या आठ दिवसात वेगवेगळे किर्तनकारांचे किर्तन होणार असुन खंजरी भजनाचा कार्यक्रम सुध्दा विविध मंडळांमार्फत आयोजित केला आहे.यावेळी साप्ताहिक गायनाचार्य ह.भ.प.अरबट महाराज(आळंदी),ह.भ.प.सोपान महाराज लोखंडे(शिरचोळी)तसेच मृदुंगाचार्य ह.भ.प.कपिल महाराज शेळके (अकोला हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर,विश्वस्त बाळासाहेब देशमुख, प्रविण घुईखेडकर,राजाभाऊ चौधरी यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे