Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्यपाल कोश्यारी देणार राजीनामा; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण…

राज्यपाल कोश्यारी देणार राजीनामा; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण…

▪️ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती.

▪️ अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून आता आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. परवा पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे.

▪️ राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता. त्यांनी उचलबांगडी करावी, अशी मागणी अनेकांनी केली. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.

▪️आता अखेर खुद्द कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते पायउतार होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यांनी राजीनामा पत्र पंतप्रधानांकडे दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे