Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार बच्चू कडू यांचा शाखा अभियंत्यावर संताप‎ असं काय झालं बच्चू कडू संतापले 

आमदार बच्चू कडू यांचा शाखा अभियंत्यावर संताप‎
असं काय झालं बच्चू कडू संतापले 

MB-NEWS अमरावती : अचलपूर मतदारसंघातील चांदूर‎ बाजार तालुक्यातील करजगाव‎ येथे जलसंपदा विभाग अमरावती‎ मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून पूर‎ संरक्षण योजनेंतर्गत बोहर्डा‎ नदीपात्रात पूर संरक्षक भिंतीच्या‎ सुरू असलेल्या कामाचा‎ आमदार बच्चू कडू यांनी आढावा‎ घेतला. यावेळी त्यांनी काही‎ तांत्रिक बाबींवर नाराजी व्यक्त‎ करीत शाखा अभियंत्यावर संताप‎ व्यक्त करत त्यांची शाळा घेत‎ कामाबाबत काही सूचना दिल्या.‎

पूर संरक्षक भिंतीच्या कामाचा‎ आढावा घेताना नदीपात्रातील‎ एका बाजुची संरक्षक भिंत पाहून‎ त्यांनी नदीच्या पाण्याचा प्रवाह‎ योग्य होणार नाही, याबाबत शंका‎ उपस्थित केली. प्रारंभी‎ कामाबाबत त्यांनी काही योग्य‎ निर्देश दिले. पुलाजवळील नदीचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पात्र कमी झाल्यास पाणी थांबून‎ गावात जाण्याची भीतीही व्यक्त‎ केली. मात्र अभियंत्यांनी तांत्रिक‎ बाबी लक्षात आणून दिल्यानंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आ. कडू यांनी तत्काळ योग्य त्या‎ सुधारणा करण्याचे निर्देश‎ अधिकाऱ्यांना दिले. या वेळी‎ उपविभागीय अभियंता अनिल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मेश्राम, शाखा अभियंता सतीश‎ सरोदे, पदाधिकारी सुरेश‎ गणेशकर, सुरेश भेंडे, संदीप‎ घुलक्षे, नितीन चौधरी, संजय‎ वसु, राहुल भेंडे, देविदास म्हाला,‎ सचिन सोलव, तय्यब खाँ भाई,‎ तसलीम भाई, बबलु भाई, महादेव‎ मनोहरे आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे