Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गौलखेडा बाजार येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार

गौलखेडा बाजार येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार

MB-NEWS (अक्षय अथोटे)मेळघाट,चिखलदरा प्रतिनिधी:-
मेळघाट विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार गौलखेडा बाजर येथे स्व.तुळशीरामजी काळे माजी आमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन गौरखेडा बाजार येथे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक केवलराम काळे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी हाजी हजेरी लावली यावेळी सरपंच आणि उपसरपंच सदस्य यांचा मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक माजी आमदार केवलराम काळे, अध्यक्ष मनिराम दहीकर,प्रमुख पाहुणे माजी जि.प.सदस्य शांताबाई काळे,माजी प.स.सभापती कवीता काळे,जिल्हा उपाध्यक्ष यशवंत काळे, सरपंच अल्केश महल्ले,सुजित भाष्कर, आकाश जयस्वाल,ओमप्रकाश मावस्कर, संजय भाष्कर,यांच्यासह गौलखेडा बाजार, नागापूर, जामली आर, बदनापूर, मोरगड, बोराळा, अंबापाटी, चिचखेड, तेलखार, वस्तापूर, कुलंगणा, सोमवारखेडा, आकी, बागलिंगा, भांडुम आडनदी, बहाद्दपूर येथील सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे