Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

वडिलांचे आदल्यादिवशी निधन झाले मात्र कल्याणीने केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण

वडिलांचे आदल्यादिवशी निधन झाले मात्र कल्याणीने केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण

MB-NEWS (चांदुर रेल्वे):- वडिलांचे आदल्यादिवशी निधन झाले पण ते दुःख बाजूला सारत वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी ती क्रीडा स्पर्धेत उतरली आणि उपविजयी ठरत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली जि. प. पू. मा. शाळा निमगव्हाण ह्या शाळेच्या माध्यमिक मुली (कबड्डी) ह्या खेळप्रकारा करीता जिल्हा परिषदेच्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवा मध्ये उपविजयी म्हणून आज पारितोषिक देण्यात आले.
निमगव्हान शाळेच्या कबड्डी चमूची कर्णधार कु. कल्याणी सतीश शिंदे ही कब्बडी मध्ये उत्तम रेडर म्हणून परिचित आहे, तालुक्यात तिच्या पकड चे सर्वत्र कौतुक झाले होते, त्यातच तिच्या शाळेची जिल्ह्यास्तरावर निवड झाली 31 तारखेला स्पर्धा होती तर 30 जानेवारी रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले. कल्याणी उद्या खेळणार नाही असेच तिच्या सर्व मैत्रिणींना आणि शिक्षकांना सुद्धा वाटत होते. परंतु रात्री तिने कळवले की मी उद्या खेळायला येणार आहे. वडील आजारी असतांना त्यांनी शाळेत येऊन कल्याणीच्या स्पर्धेविषयी शिक्षकांशी चर्चा केली होती आणि आमची कल्याणी नक्कीच शाळेसाठी बक्षीस आणणार असे शिक्षकांना सांगून गेल्याचे कळते त्यावरून त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्याणीच्या आई आणि आजी यांनी खेळायला जाण्याकरिता परवानगी दिली आहे. कल्याणी दुसऱ्या दिवशी ती मैदानात उतरली आणि सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत पोचली. अंतिम फेरीतला सामना हा धारणी संघाबरोबर होता. ह्या सामन्यात मात्र त्यांना हार मानावी लागली. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तिने जी खेळा प्रती आस्था ,प्रेम दाखवले. जिद्द दाखवली. त्या जिद्दीला खरोखर सलाम संपूर्ण जिल्ह्यात तिच्या या धैर्याचे कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे