Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार – हवामान विभागाचा अंदाज जारी,  अमरावती 10.5सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार – हवामान विभागाचा अंदाज जारी,  अमरावती 10.5सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

राज्याला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे, मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडी गायब झाल्यानंतर दाट धुके पसरले होते. तसेच महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसले मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठताना दिसतो आहे. सध्या उत्तर भारत व राजस्थानमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान घसरले असून, त्यात परभणी 8.2, नागपूर – 9.4, औरंगाबाद – 9.6, यवतमाळ – 10.0, पुणे – 10.3, अमरावती 10.5, अकोला – 10.6, गोंदिया 10.8, वर्धा 11.2, नाशिकचे तापमान 11.3, चंद्रपूरचे तापमान 11.4 सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.तसेच पुढील काही दिवसात हा पारा आणखी खाली जाऊन थंडी वाढेल,

असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे