Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती.

नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट दिले होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजीत निवडून देखील आले होते.

यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते. मात्र असे असताना आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे