Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय! प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय! प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री

MB-NEWS (पुणे):-दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल, पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे.

तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी ‘रनर’ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात *व्हिडिओ रेकॉर्डिंग* करावे लागणार आहे. तत्पूर्वी, बोर्ड परीक्षेला कॉपी करणे गुन्हा आहे, कॉपी केल्यास काय शिक्षा होऊ शकते, पेपर पारदर्शक व प्रामाणिकपणे कसा सोडवायचा, याचे धडे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात द्यायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटामागे देखील त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

*रनर’कडे व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी*
दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या ‘रनर’ला कस्टडीतून निघल्यापासून केंद्रावर पोचेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. तसेच केंद्र संचालकांना सिलबंद पॉकिट देताना व दालनात प्रश्नपत्रिका वाटप करतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी.
▪️ प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहण्याचा असावा सराव
▪️कॉपी केल्यास होईल कारवाई; ऑबजेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे सांगितली जाणार नाहीत
▪️पेपर सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोचा
▪️ संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा; कशाचाही मनावर नसावा तणाव

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे