Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

हा वाढला विचित्रपणा!ऐसा नोहे शिमगा जाणा राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रथातुन दिला होळीचा संदेश…

हा वाढला विचित्रपणा!ऐसा नोहे शिमगा जाणा
राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रथातुन दिला होळीचा संदेश…

MB-NEWS :-(गुरुकुंज मोझरी)सुनिल घोरमाडे ता. प्र.:- ग्रामसफाई सामुदायीक रीत्या करून नाली मोरीतला कचरा साफ करून त्याची होळी करने जाळने, अथवा खताच्या गड्यात पुरणे ज्यामुळे कंपोज खत शेतीच्या उपयोगी पडते. गावाच,कुटुंबाच आरोग्य नीरोगी राहु शकते.
होळीचा आला शीमगा सण । त्यात मोठी मारहाण ।
लोक इभ्रत, मान सोडोन। पळती मार्गी वेडेसे।।
हा वाढला विचित्रपणा। ऐसा नोहे शीमगा जाणा ।
त्यातही आहे तात्विकणा । घेण्यासारिखा समाजा॥
पण होळी सणाचा खरा उद्येश बाजुला राहुन चांगली लाकड होळीत जाळने ही वाईट परंपरा झपाट्याने वाढली. त्याच समर्थन करणारा वर्ग नीर्माण झाला आहे. अनेक किर्तनकार,प्रवचनकार, प्रबोधनकार अशा मानवी जीवन उध्दवस्थ करणाऱ्या वाईट रूढ्यांचा वीरोध न करता कपोकल्पीत मनोरंजक भाकड कथा सांगत लोकसमुहाला मनोरंजनाची घुटी पाजतात. काही सत्य विज्ञानवाद सांगनाऱ्या प्रबोधन करणाऱ्यांची समाज टींगल टवाळी करतो.
होळी-धुलीवंदन बोंबा मारायचा सण, दारू मादक द्रव्याचे सेवन करण्याचा सण, गावातील हेवेदावे, राजकारण या सणात उफाळून येतात. रत्करंजीत होळी गावात खेळतांना अनेक घटनां आम्ही पाहतो. होळी-धुलीवंदनां नंतरची वर्तमानपत्रे रक्तरंजीत बातम्यांनी भरलेली असतात.
अशा सर्व धामधुमीत मोठ्या प्रमाणात युवापीढी आनंदाचे क्षण न शोधता मटन पारट्या, दारूपारट्या यालाच आनंद समजतात. हा जीवनातील आनंद नाही तर मनोरंजन आहे. मनोरंजन हा क्षणीक आनंद वाटतो पण ते दुःखाचे अनेकदा कारण ठरते. अनेकदा अपघात घडतात, मानवी सुंदर शरीर नासवते. वैरभाव वाढवने म्हणजे सण उत्सव का?
गावी वेगळाची विपर्यास झाला I ग्रामशुध्दीचा उद्येश गेला ।

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे