Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगाव ठाकूर येथील युवतीची भरारी, बनली एअर होस्टेस…..नाजुका पियुष पवार , (विष्णूपंत मोटघरे यांची मुलगी )

तळेगाव ठाकूर येथील युवतीची भरारी, बनली एअर होस्टेस…..नाजुका पियुष पवार , (विष्णूपंत मोटघरे यांची मुलगी )

(जागतिक महिला दिन विशेष)

MB-NEWS तिवसा(ता.प्र.)सुनिल घोरमाडे:- -पंखावरती विश्वास ठेवून भरारी घेतली की, आकाशाला गवसणी घालता येते, हे सिद्ध केले आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील आखाती देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेत हवाई सुंदरी म्हणून तिची निवड झाली आहे.

लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असलेल्या नाजुकाने शैक्षणिक जीवनात प्राथमिक, माध्यमिकच काय, तर पदवीपर्यंत पहिल्या क्रमांकावर दबदबा कायम ठेवला. परिस्थितीशी दोन हात करीत मोठे होण्याच्या स्वप्नाचा पिच्छा पुरविला. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या नाजुकाला पदवी शिक्षणापर्यंत हवाई सुंदरी या क्षेत्राची फारशी माहिती नव्हती. केवळ जिद्द, चिकाटी व मेहनत याच बळावर तिने आकाशात झेप घेतली. त्यासाठी तिने

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व मिळविले. नैसर्गिक सौंदर्याला वक्तृत्व कला, सकारात्मक देहबोली, हजरजबाबीपणा यांची जोड दिली. विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केल्यानंतर नागपूर येथील एका विमानसेवा प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला व तेथूनच तिच्या पंखांना बळ मिळाले. आज परराष्ट्रीय विमानसेवेत दाखल होणारी ग्रामीण भागातील पहिली हवाई सुंदरी म्हणून नाजुकाने आपले नाव कोरले.

डॉक्टर व्हायचे होते पण…

नाजुकाला वैद्यकीय क्षेत्राचे आकर्षण होते. त्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असे तिला वाटायचे. परंतु, प्रश्न ऐपतीचा होता. त्यामुळे बी. एस्सी. करून तिने पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात प्रवेश घेईपर्यंत विमानसेवेची कल्पनाही नव्हती. परंतु, महाविद्यालयीन मैत्रिणी कॉलेज कट्ट्यावर नेहमी विमानसेवेच्या नोकरीबाबत चर्चा, करायच्या व तेथूनच ध्येय निश्चित झाले. नाजुकाने अंतिम निवडीपूर्वी सहा-सात वेळा हवाई सुंदरीसाठी मुलाखती दिल्या. तरीही खचून न जाता सातत्य कायम ठेवले व आपले ध्येय गाठले. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येते, असा तिचा विश्वास आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे