Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रागाच्या भरात वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली..

रागाच्या भरात वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली..

 

चंद्रपूर :- दारु दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद नवे नाहीत. मात्र, दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जटपुरा गेट जवळीक आनंद वाईन शॉप येथे घडली आहे. दुकानाचे संचालक संदिप अडवाणी ह्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाईन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने क्षुल्लक वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ग्राहकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असून मद्यापींची येथे कायम गर्दी असते. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाईन शॉप सुरू केले. या वाईन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना मन:स्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी रात्री एक ग्राहक वाईन शॉपमध्ये गेला असता क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या मारहाण प्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे