Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न..आंदोलन प्रसंगी शासन विरोधात प्रचंड नारेबाजी

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न..आंदोलन प्रसंगी शासन विरोधात प्रचंड नारेबाजी..

 

अमरावती :-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केलेल्या आवाहनानुसार अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती ग्रामीण व महानगर तर्फे दुपारी ३ ते ६ या कालावधीत धरणे आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली. जुनी पेन्शन योजनेसह इतरही अनेक मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्यामुळे शासनाचे विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. शेवटी शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांना निवेदन देण्यात येऊन शासनाकडे निवेदन त्वरित पाठविण्याबाबत विनंती करण्यात आली.

नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०, २०, ३० वर्षे लाभाची आश्वाशित प्रगती योजना लागू करणे, रिक्त पदे त्वरित भरणे, शाळेच्या वयानुसार अनुदानाचा टप्पा मंजूर करणे, इयत्ता ६ ते ८ ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना हायस्कूल शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करणे, वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रशिक्षण निःशुल्क आयोजित करणे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करणे या इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विदर्भस्तरीय आंदोलन आयोजित केले होते.

अमरावती येथील हे आंदोलन विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न झालेल्या या आंदोलनात प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, महानगर अध्यक्ष अतुल देशमुख, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार चैनानी, शिक्षकेतर महामंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव पाटील आदिंची भाषणे झालीत. संचलन जिल्हा कार्यवाह जयंत सराटकर यांनी केले. याप्रसंगी माजी विभागीय कार्यवाह बाबाराव कडू, महानगर कार्यवाह अरविंद चौधरी, निळकंठ गणवीर, गजेंद्र शेंडे, हर्षवर्धन देशमुख रविंद्र मांगलेकर, सुयोग काळबांडे, विनोद सोसे आदि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे