Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विनायक विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या अदिबा खान विद्यार्थिनीचे यश

विनायक विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या अदिबा खान विद्यार्थिनीचे यश

MB न्युज(नांदगाव खंडेश्वर पवन ठाकरे):-28 फेब्रुवारी , राष्ट्रीय विज्ञान दिवस या दिनाचे औचित्य साधून “बजाज कॉलेज ऑफ सायन्स”, वर्धा व “नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी “Scintillation -23” राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कु.अदिबा समन अनिस खान ,बीएससी भाग III या विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा विषय “करंट ट्रेंड्स इन बेसिक सायन्स” होता. यामध्ये अदिबा खान हीने करंट ट्रेंड्स इन केमिस्ट्री यावर विषयावर सेमिनार दिला. आपल्या सेमिनारमध्ये तिने ग्लोबल वार्मिंग व त्यावर होणाऱ्या संशोधनाबद्दल सर्वांना माहिती दिली. आपला विषय तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या स्वरूपामध्ये सर्वांसमोर मांडला व तिला या स्पर्धेसाठी प्रथम प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले .बक्षीसाचे स्वरूप प्रमाणपत्र व एक हजार रुपये रोख पारितोषिक होते. या स्पर्धेच्या तयारीकरिता डॉ. कविता काकडे यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेसाठी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री निलेश पडोळे, डॉ. कविता काकडे व डॉ. विनोद शेरेकर यांनी परिश्रम घेतले व आदिबा खान च्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ.अलका भिसे व डॉ. सुचिता खोडके IQAC समन्वयक यांनी तिचे कौतुक केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे