Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दीडशे वर्षाची परंपरा कायम……येवती येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात मंदिरा मध्ये संपन्न ,नऊ दिवस केले होते धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन*

दीडशे वर्षाची परंपरा कायम……येवती येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात मंदिरा मध्ये संपन्न ,नऊ दिवस केले होते धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

MB News
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे (प्रतिनिधी):-
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथे श्रीराम नवमी उत्सव मोठा थाटात संपन्न झाला या उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रोज सकाळी काकाड आरती 6 ते 7 व श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येत होता त्यानतंर रोज सकाळी 9 ते 5 रामायण कथा ह भ प आसटकर गुरुजी यांच्या अमृतुल्य वाणीतून संपन्न झाले,
व रात्री हरीपाठ 6 ते 7 पर्यंत होत होता तसेच रात्री 9 ते 11 रोज संध्याकाळी हरीकिर्तन झाले प्रथम दिनी किर्तन ह भ प कार्तिक महाराज चवात येवती, दुसऱ्या दिवशी ह भ प योगेश महाराज ढवळे यवतमाळ, तिसऱ्या दिवशी चे कीर्तन ह भ प प्रंशात महाराज मामनकर ( पाटिल ),चतुर्थ दिवसी ह भ प किशोर महाराज काळे राम आश्रम, पाचवे दिवसी ह भ प सोहम महाराज काकडे बाल कीर्तनकार मेहकर, सहाव्या दिवशी चे कीर्तन दिनेश महाराज वक्ते नांदुरा, सातव्या दिवशीचे कीर्तन ह भ प महेश महाराज मारवाडी वाडेगाव, श्री राम जन्मोत्सव किर्तन ह भ प प्रमोद महाराज रहाने आळंदी, यांचे झाले संध्याकाळी ह भ प स्वामी महाराज येवतीकर बालकिर्तनकार येवती यांचे झाले काल्याचे किर्तन ह भ प अमोल महाराज घुगे आळंदी यांचे झाले किर्तना नंतर महाप्रसाद सायंकाळी 5 वाजता दहीहांडी व येवती गावामध्ये भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली शोभायात्रेमध्ये वारकरी भजन मंडळ गौळपेंड येथील दिंडी श्री गजानन महाराज महिला भजन मंडळ येवती श्री ज्ञानेश्वर महाराज महिला भजन मंडळ येवती श्री अवधूत महिला भजन मंडळ येवती श्री अवधूत पुरुष भजन मंडळ येवती वारकरी भजन मंडळ पिंपरी वारकरी भजन मंडळ धामक व येवती गावातील असंख महिला व पुरुष मंडळी या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेले होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे