Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती स्व. नरहरी देशमुख सार्वजनिक वाचनालयात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती स्व. नरहरी देशमुख सार्वजनिक वाचनालयात संपन्न

चांदुर रेल्वे – : येथूनच जवळ असलेल्या निंभा या गावात स्व. नरहरी शेषराव देशमुख सार्वजनिक वाचनालय निंभा येथे नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले ” बाबा साहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल रोजी झाला असल्याने हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून ओळखला जातो. सर्व भारतीयांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्यांनी आपल्या समाजातील दलित आणि इतर वंचित गटांसाठी अथक प्रचार केला, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. ते राजकारणी, न्यायाधीश, मानववंशशास्त्रीय, शिक्षक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. भारतीय इतिहासात हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे, आंबेडकराची जयंती देशभरातील भारतीय लोक मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी करतात.”

यावेळी गावातील गोविंदराव देशमुख ,उत्तमराव वासनिक, सिद्धार्थ पारवे, उद्धवराव देशमुख , लखन जाधव ,दिवाकर जाधव ,पवन देशमुख ,हसंता धनीस्कार , शरद देशमुख , गजानन श्रीरामे , श्रीकृष्ण मेश्राम, देवरावजी खोब्रागडे भाऊसाहेब, दिलीप देशमुख, मिलिंद देशमुख, तुर्काने ,झाडे ,कांबळे ,बाल्या देशमुख ,दिलेश देशमुख ,रवी जगताप ,किसनराव देशमुख ,रणजीत देशमुख,गजानन देशमुख, राजदीप इंगळे ,सौ चंदा देशमुख , कु. सुषमा देशमुख हे सर्व गावातील लोक उपस्थित होते.
तसेच रात्री दिलीपराव देशमुख यांच्या घरासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभात फेरी निघतात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण केले .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे