Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत धामणगाव रेल्वे तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत

अखिल भारतीय ग्राहक पंचायत धामणगाव रेल्वे तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत

MB-NEWS (धामणगाव रेल्वे):-प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असून ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याची फसवणूक होऊ नये तसेच त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत संपूर्ण देशामध्ये कार्यरत आहे, ही अराजकीय संघटना आहे . याच संघटनेची एक शाखा धामणगाव रेल्वे येथे सुरू करण्याकरिता डॉ. शालिग्राम कडू यांचे पुढाकाराने गणेश लोण येथे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली .

अमरावती जिल्ह्याचे संघटन मंत्री अशोक हांडे यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉक्टर चंदनसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी धामणगाव तालुक्याची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली .

अध्यक्षपदी डॉ. शालिग्राम कडू,उपाध्यक्षपदी निरंजन राऊत,
तालुका संघटन मंत्रीपदी निरंजन देशमुख,,सचिव पदी महेंद्र रोंघे
कोषाध्यक्ष मंगेश ढाले,कार्यकारणी सदस्य-विलास कडू, विनोद हांडे, मनोज वेरूळकरयांची सरवानुमते निवड करण्यात आली .धामणगाव मधील नागरिकांची फसवणूक झाल्यास वरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले .

नवीन कार्यकारिणीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायणराव मेहेरे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉक्टर अजय गाडे, प्रांत संघटक नितीनजी काकडे, अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ. विजय टोम्पे, डॉ. मनीष कडू, जिल्हा सचिव आनंद संगई, प्रसिद्धी प्रमुख चारुदत्त चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे