Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मंगरूळ दस्तगीर येथील महावितरणचे तंत्रज्ञ विठ्ठल डोईफोडे सन्मानित…..कामगारदिनी गुणवंत कामगार म्हणून सत्कार

मंगरूळ दस्तगीर येथील महावितरणचे तंत्रज्ञ विठ्ठल डोईफोडे सन्मानित…..कामगारदिनी गुणवंत कामगार म्हणून सत्कार

 

MB-NEWS (धामणगाव रेल्वे ) :-धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ विठ्ठल डोईफोडे यांचा कामगारदिनी गुणवंत कामगार म्हणून अमरावती येथे सत्कार करण्यात आला.

महावितरणच्या अमरावती झोन अंतर्गत १ मे कामगार दिनी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अशातच वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर मंगरूळ दस्तगीर कक्ष १ येथे कार्यरत विठ्ठल डोईफोडे यांचा गुणवंत कामगार म्हणून अमरावती झोनचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुळकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सन्मानाबद्दल विठ्ठल डोईफोडे यांचे मंगरूळ दस्तगीर कक्ष कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले. तर या सत्काराला उत्तर देतांना विठ्ठल डोईफोडे यांनी म्हटले की, ज्या कामामुळे सदर सन्मान मिळाला याकरिता मला उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उमेश राठोड व सहाय्यक अभियंता अख्तर खान यांचे मार्गदर्शन मिळाले असून त्यांच्या सूचनेनुसार सबडीव्हीजन मधून वसुलीसाठी मदत मिळाली. तसेच महावितरणचे राजु सळमाके, पवन वाघ, संजु सोळंके, शैलेश ढवळे, यंत्रचालक सचिन खोडके व इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य मिळाले. यांच्यामुळेच मी थकबाकी शून्य करू शकलो. तरी मी सर्वांचे आभार मानतो व मला असेच भविष्यातही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो असे विठ्ठल डोईफोडे यांनी म्हटले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे