Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सिपना महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

सिपना महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

MB-NEWS(अक्षय अथोटे)चिखलदरा, प्रतिनिधी:- सिपना शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचालित चिखलदरा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थ्यांकरिता मॉडेल व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती जोपासली जावी, त्यांच्या नवकल्पनांना वाव मिळावा हे या स्पर्धेच्या आयोजनामधील मुख्य उद्दिष्ट होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल व पोस्टर सादर केले. या स्पर्धेकरिता डॉ. व्ही. एस. मंगळे, प्रा. बी. एस. देशमुख, डॉ. एम. बी. सरदार व डॉ. ए.आर. बक्षी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आर. एस. जयपुरकर यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मॉडेल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. त्रिवेणी गिर्हे व सय्यद मुसद्दीक, द्वितीय क्रमांक कु. राधिका शर्मा आणि तृतीय क्रमांक अक्षय कास्देकर व कु. प्रणाली कुर्हेकर यांनी प्राप्त केला. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. साक्षी जोग, द्वितीय क्रमांक कु. काजल पाटील आणि तृतीय क्रमांक कु. सविता खडके या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. महाविद्यालयातील रिसर्च क्लब द्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता रिसर्च क्लबचे समन्वयक डॉ. एन.जे. सूर्यवंशी, समिती सदस्य डॉ. एन. वाय. भोगे, प्रा. एन. एस. बायस्कर, डॉ. एच. यु. पेटकर, डॉ. पी.एम. कुटे यांनी प्रयत्न केले. तांत्रिक सहाय्य ए. जी. ढगे यांनी प्रदान केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे