Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणूक बिनविरोध… आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष..

अमरावती बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणूक बिनविरोध…

आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष..

MB-NEWS सुनिल घोरमाडे (प्रतिनिधी) :– अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या आज 19 मे रोजी पार पडलेल्या निवडणूकीत सभापती पदी हरिष मोरे तर उपसभापती पदी भैय्यासाहेब निर्मळ यांची बिनविरोध निवड होताच काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या गणेडिवाल स्थित निवासस्थानी गुलाल उधळत व फटाक्यांची आतिशबाजी करुन जल्लोष साजरा केला.

पश्चिम विदर्भात महत्वाच्या असलेल्या अमरावती बाजार समितीच्या निवडणूकीत माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात वज्रमुठ बांधून सर्वच म्हणजे 18 पैकी 18 जागांवर महाविकास आघाडीने अभुतपूर्व नेत्रदिपक विजय मिळविला होता. हा विजय जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा देणारा ठरला अन् या अभुतपूर्व विजयाच्या यशोमती ठाकूर शिल्पकार ठरल्या होत्या.

*सभापती, उपसभापती बिनविरोध निवडणूक अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष*
आज 19 मे रोजी सभापती, उपसभापतीची निवडणूक पार पडली. यामध्ये सभापती पदी कॉंग्रेसचे हरिष मोरे तर उपसभापती पदी शिवसेनेचे भैय्यासाहेब निर्मळ यांची बिनविरोध निवड झाली. निकालाची घोषणा होताच असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या गणेडिवाल स्थित निवासस्थानी या विजयाचा गुलाल उधळून व फटाक्यांची आतिशबाजी करत प्रचंड जल्लोष साजरा केला. यावेळी मनोज देशमुख, सुनिल वऱ्हाडे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, मुकद्दर खाँ पठान, संजय नागोने, प्रविण मनोहर, अमित गावंडे, विरेंद्र जाधव, नरेंद्र मकेश्वर, ॲड. महेंद्र दिवान, निलेश मानकर, अशोक दहिकर, डॉ. रामदास रहाटे, प्रविण भुगूल, बाळासाहेब देशमुख, पंकज देशमुख, दिलीप सोनोने, शैलेश काळबांडे, शैलेश खोडस्कर, प्रभाकर धंदर, वहिद भाई, गजू ठाकूर, अंकुश जुनघरे, अमोल महात्मे, हरिराम लव्हाळे, विजयराव देशमुख, प्रमोद कळस्कर, सौरभ किरक्टे, प्रज्योत यावले, भैय्यासाहेब बुरघाटे, रेखा सरोदे, ज्योती ठाकरे, शिल्पा महल्ले, माया बुरघाटे, रिजवान भाई, नदिम भाई, डॉ. रमेश बोरा, नरेंद्र ठाकूर, जय रघुवंशी, तुषार देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे