Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

*श्रीक्षेत्र कौंडण्यपूरची पालखी 26 मे रोजी अमरावतीत,*आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणारस्वागत*

*श्रीक्षेत्र कौंडण्यपूरची पालखी 26 मे रोजी अमरावतीत,*आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणारस्वागत*

MB-NEWS (अमरावती)प्रतिनिधी- :- अतिप्राचिन श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेची पालखी 26 मे रोजी अमरावती येथे दाखल होणार असून या मानाच्या पालखीचे स्वागत शहरातील बियाणी चौक येथे आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेची पालखी पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पर्वावर दरवर्षी सहभागी होत असते. या पालखीला 429 वर्षाची अखंडीत परंपरा आहे. कौंडण्यपूर हे रुख्मिणी मातेचे माहेर असून प्रभु रामचंद्राची आजी राजा दशरथची आई इंदुमती, नल राजाची पत्नी दमयंती, भगिरथ राजाची माता केशनी आणि अगस्ती ऋषिंची पत्नी लोपामुद्रा असे महात्मे लाभले आहे.

*शासकीय पुजनाची परंपरा*
श्रीक्षेत्र पंढरपुर येथे दरवर्षी शासकीय महापुजा करण्यात येते, त्याचधर्तीवर कौंडण्यपूर येथेही शासकीय महापुजा व्हावी यासाठी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांचे प्रयत्न फलद्रुप ठरले असून आता दरवर्षी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे रुख्मिणी मातेची शासकीय पुजा करण्यात येते. या पालखीचे आगमन 26 मे रोजी दुपारी 5.00 वा. अमरावती शहरातील बियाणी चौकात आगमन होणार असून आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पुजन करण्यात येणार आहे.

*श्रीक्षेत्र पंढरपुर येथे मानाची पुजा*
श्रीक्षेत्र पंढरपुर येथे या 429 वर्षाची पुरातन परंपरा असलेल्या रुख्मिणी मातेला मानाची पुजा करण्यात यावी यासाठीही आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी श्रीक्षेत्र पंढरपुर येथील विश्वतांना विनंती केली होती. त्या विनंतीची दखल घेवून आता रुख्मिणी मातेच्या पालखीचीही मानाची पुजा करण्यात येते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे