Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पडली पार,पत्रकार संघाचे सभासदांना ओळखपत्र देणार.पत्रकार संघाला शासनाच्या विविध समितीवर प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पडली पार,पत्रकार संघाचे सभासदांना ओळखपत्र देणार.पत्रकार संघाला शासनाच्या विविध समितीवर प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी

MB-NEWS(अमरावती):-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक हॉटेल ईगल,अमरावती येथे संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने होते.यावेळी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे कामाविषयी चर्चा करण्यात आली.तसेच तांत्रिक अडचणीमूळे संघटनेच्या सदस्यांना ओळख पत्र देण्यास विलंब झाला.त्यावर यावेळी तोडगा काढण्यात आला असुन ओळख पत्राची वैधता १ जानेवारी ते ३१ मे २०२४ ठरविण्यात आली आणि ओळख पत्राचे काम तातडीने करून पत्रकार संघाच्या सभासदांना त्वरीत ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे मनोहर सुने यांनी सांगीतले आहे.बैठकीनंतर पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी माहिती व जनसंपर्क संचालनालय,अमरावती विभागीय उपसंचालक कार्यालयाला भेट देवून अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून अमरावती विभागीय उपसंचालक हर्षवर्धन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोहर सुने, कैलासबापू देशमुख यांनी शासनाच्या विविध समितीवर पत्रकार संघाला प्रतिनिधी मिळावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान,केंद्रीय सचिव अशोक पवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख दिनेश भटकर,प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे,अमरावती महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे,संतोष चव्हाण व निलेश राजस केंद्रीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे