पत्रकार कृतज्ञता सोहळा.पत्रकार खरोखरच समाजाचा आरसा आहे.– राजेश वानखडे . ग्रामीण पत्रकारांचा आदर सत्कार.

पत्रकार कृतज्ञता सोहळा.पत्रकार खरोखरच समाजाचा आरसा आहे.– राजेश वानखडे . ग्रामीण पत्रकारांचा आदर सत्कार.

 

MB-NEWS(तिवसा) प्रतिनिधी – राजकीय वाटचाल करत असतांना त्यामाध्यमातून समाजकारण केल्या जाते.तरीही त्या समाजकारणाला राजकीय किनार असते.परंतु पत्रकार अहोरात्र मेहनत घेऊन प्रामाणिकपणे समाजसेवा करतात.हे अविरत कार्य करतांना पत्रकारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत आपण अनभिज्ञ असतो.परंतु कसलीही तक्रार न करता पत्रकार अविरतपणे आपली सेवा बजावतात.असे गौरवोद्गार लोकसभा संयोजक तथा भाजप नेते राजेश वानखडे यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार कृतज्ञता सोहळा या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय देशमुख, नगरसेवक अनिल थुल, माजी नगरसेवक प्रदीप गौरखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव भूषण यावले, रहिम शहा, अण्णा पडोळे, अनिकेत वानखडे उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता समाजातील अनिष्ट रूढी परंपरा,अन्याय, अत्याचार याविरोधात आपल्या लेखणीला शस्त्र बनवून पत्रकार सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत असतात.
तसेच कोरोना काळात पत्रकारांनी आपला व आपल्या कुटुंबाचा विचार न करता निर्भिडपणे सामाजिक कर्तव्य बजावले.तसेच कोणत्याही आपत्तीत पत्रकार हे समाजाचा आरसा बनुन उभे राहतात.त्यामुळे त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ‌
यावेळी राजेश वानखडे यांचे हस्ते पत्रकार जानराव मनोहर अ.भा.पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भुषण यावले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत निखाडे, संदीप राऊत,सुरज दाहाट, जयंत निखाडे, नंदु मते, अंकुश बोके यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे