Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आला पावसाळा-आरोग्य सांभाळा; अशी घ्या आरोग्याची काळजी…!

आला पावसाळा-आरोग्य सांभाळा; अशी घ्या आरोग्याची काळजी…!

पावसाळा म्हटला की हिरवे रान, थंडगार वार, गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा हे लगेच डोळ्यासमोर येते. पण या आल्हादायक वातावरणासोबतच पावसाळा घेवून येतो आजार आणि अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळयात नागरिकांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्वाचे आहे. या पावसाळ्यात नागरिकांनी काय करायचे आणि काय टाळाचे, नागरीकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी काही टिप्स. पावसाळयात घ्यावयाची काळजी….

➢ पावसात भिजणे सहसा टाळावे आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलने अंग व केस कोरडे करावे.
➢ ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नये.
➢ बॅगमध्ये मोठा रूमाल आणि एक्स्ट्रा फेस मास्क ठेवावा. ओला मास्क वापरणे टाळावे.
➢ पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करावी आणि मग कोरडे कपडे घालावेत.
➢ अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारे जंतुसंसर्ग टाळता येतात.
➢ केस, कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाणे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला, असे आजार होण्याची शक्यता असते.
➢ आपले घर, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच घराच्या आजूबाजूला कुंड्यांमध्ये पाणी साठत असेल तर वेळोवेळी ते काढावे. त्यामुळे साठलेल्या पाण्यात होणारी डासांची पैदास थांबेल.
घरातील भांडी, कपडे कोरडे ठेवावेत.

आहाराविषयी काळजी –
बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
रस्त्यावरील कुल्फी, फळांचे रस पिणे टाळा.
अती तळलेले, मसालेदार, आंबट, अती थंड पदार्थ खाणे टाळा.
मासांहार करणा-या व्यक्तींनी या दिवसात मासे खाणे टाळावे कारण हा मौसम माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
🫚 आहारात आले, गवती चहा, हळद, तूप, भाज्यांचे सूप, ताज्या भाज्यांचा समावेश असावा.
पचायला हल्याक्या पदार्थांचा समावेश जेवणात करावा.
गरम जेवणाचे सेवन करावे.

 *डासांपासून सुरक्षित रहा :* डासांमुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरतात. डासांना दूर ठेवण्यासाठी क्रीमचा वापर करा.

 *हातपाय स्वच्छ धुवा :* पावसाळाच्या दिवसात कोणत्याही ठिकाणी विषाणू बसलेले असतात. त्यामुळेच बाहेरुन आल्यानंतर अन्न पदार्थ खाण्याआधी किंवा घरभर फिरण्याआधी हात पाय स्वच्छ धुवावे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे