Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

उपेक्षित राहिलेल्या समाजाला एकत्रित होऊन न्याय देणार,आद्य क्रांतिगुरु लहुजी कृती समितीचे प्रतिपादन,

उपेक्षित राहिलेल्या समाजाला एकत्रित होऊन न्याय देणार,आद्य क्रांतिगुरु लहुजी कृती समितीचे प्रतिपादन,

MB-NEWS( रवि कलाने ):-धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील समस्त मातंग समाजातील सर्व नेत्यांची बैठक चांदुर रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली,आद्य क्रांतिगुरू लहुजी कृती समितीचे माध्यमातून मतदारसंघातील सर्व मातंग समाज आता एकत्रितपणे लढा देणार असून या कृती समितीचे कोणतेही पदाधिकारी राहणार नाही असे ठरविण्यात आले

या मतदारसंघात सुमारे 21,000 मतदार मातंग समाजाचे असून निवडणूकी च्या वेळी विविध नेत्यांकडून लो.अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे आश्वासन देण्यात येते पण आजपर्यंत ते पूर्ण केल्या गेले नाही या तिन्ही तालुक्यात एक ही स्मारक नसल्याने मोठी खंत व्यक्त केल्या गेली. समाजाच्या अनेक समस्याचा उहापोह त्यावरील उपाययोजना याबाबतीत चर्चा करण्यात आली व आतापर्यंत झालेल्या दुर्लक्षा बाबत कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळेच आता उपेक्षित असलेल्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आद्यक्रांती गुरू लहुजी कृती समितीची निर्मिती झाली असे समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी अनिल वानखडे, दादाराव स्वर्गे,रमेश अवचारे,बाळासाहेब सोर्गीवकर,विनोद तिरळे, रणजीत पाटेकर, संतोष वाघमारे,हनुमंत वानखडे,अनिल हिवराळे,अरुण गायकवाड, नंदूभाऊ सोर्गीवकर, कैलास वानखडे,योगेश अंभोरे,प्रकाश दांडगे,विनोद वानखडे,सुभाष पाळण,रणजित पडघान,भारत खंडारे,प्रकाश वानखडे, पवन पायघन,सुभाष खडसे,किशोर चांदणे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे