Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला चांदूर रेल्वे येथील घटना…

दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला चांदूर रेल्वे येथील घटना…

MB NEWS (चांदुर रेल्वे ):-दुचाकी चोरी करतांना चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

चांदूररेल्वे शहरातील शिवाजीनगर परिसरात राहुल श्रीधर यादव या व्यक्तीची डिस्कव्हर मोटरसायकल चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपी नामे आकाश पुरुषोत्तम चव्हाण (वय २७ वर्ष, रा. बोरखडी

ता. शेलू जि. वर्धा) यास स्थानिक लोकांच्या मदतीने चांदूर रेल्वे पोलिसांनी पकडले. त्याच्या विरोधात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून हा अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते. ही कार्यवाही ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस जमादार शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम, वाहन चालक पाटील व चंदू गाडे यांनी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे