Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कार ने दुचाकीला दिली धडक, दोघे जागीच ठारनांदगाव खंडेश्वर शहराबाहेरील क्रीडा संकुल जवळील घटना…

कार ने दुचाकीला दिली धडक, दोघे जागीच ठारनांदगाव खंडेश्वर शहराबाहेरील क्रीडा संकुल जवळील घटना…

MB NEWS (अमोल इंगोले)नांदगाव खंडेश्वर –

एका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची भिषण घटना नांदगाव खंडेश्वर शहराबाहेरील क्रीडा संकुल जवळ गुरूवारी (ता. ३१) सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली. गौरव मारोतराव शेंडे (१९) व चेतन ज्ञानेश्वर चोपकर (१७) रा. शिवणी रसूलापूर, ता. नांदगाव खंडेश्वर अशी मृतक युवकांची नावे आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवस असल्यामुळे केक व इतर साहित्य नांदगाव शहरातून घेऊन मृतक गौरव शेंडे व चेतन चोपकर हे पॅशन प्रो दुचाकी क्र. एमएच २७ एझेड ५९५६ ने शिवणीकडे चालले होते. यादरम्यान क्रिडा संकुलजवळ त्यांच्या दुचाकीला आय २० कार क्र. एमएच ४८ एस १०१२ ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत असून कार चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले . कारची धडक नेमकी कशी लागली याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे