महिला महाविद्यालयात पोषण माहनिमित्ताने हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन

महिला महाविद्यालयात पोषण माहनिमित्ताने हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन

 

MB NEWS (चांदुर रेल्वे):-विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माहनिमित्ताने हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होत. दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण माहित व्हावे या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे येथील डॉ. तारे मॅडम वैद्यकीय अधिकारी, डॉ. पूर्ती लाखुर्डे मॅडम, डॉ. वैशाली भोवते मॅडम, तसेच महाविद्यालयाच्यावतीने इंग्रजी विभागप्रमुख डॉ सीमा जगताप, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप दंदे, भूगोल विभागप्रमुख प्रा. संजीव भुयार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिता एस. धुर्वे यांनी केले. संचालन प्रा. नीलिमा थोरात यांनी तर प्रा. रश्मी खेडकर, प्रा. नीलिमा टिचुकले, रेखा मेश्राम, रजनी वघवे यांनी सहकार्य केले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे